Site icon साप्ताहिक एकच ध्येय

9 यूनीकॉर्नने पहिल्या फेरीत १०० कोटी रुपये उभारले

१०० पेक्षा जास्त स्टार्ट-अप्समध्ये हा निधी गुंतवला जाईल

मुंबई : सुरुवातीपासून वाय कॉम्बिनेटरने बनवलेल्या धोरणांवर आधारलेल्या भारतातील 9यूनिकॉर्न्स अॅक्सलरेटर फंड (9यूनिकॉर्न्स) ने १०० कोटी रुपयांच्या (१४ दशलक्ष अमेरिकी डॉलर) पहिल्या फेरीची घोषणा केली आहे. हा निधी सुरुवातीच्या टप्प्यातील पहिल्या १०० पेक्षा जास्त स्टार्ट-अप्समध्ये गुंतवला जाईल. विजेत्यांचा लवकरात लवकर मागोवा घेणे, हा यामागील उद्देश आहे. 9यूनिकॉर्न्सने एकूण ३०० कोटी रुपयांचे (४२ दशलक्ष डॉलर) उद्दिष्ट ठेवले आहे.

डॉ. अपूर्व रंजन शर्मा, अनुज गोलेचा, अनिल जैन आणि गौरव जैन या व्हेंचर कॅटॅलिस्ट (व्हीकॅट्स) संस्थापकांनी 9यूनिकॉर्न्स ची स्थापना केली. भारतातील ७५ पेक्षा जास्त होमग्रोन स्टार्टअपच्या पोर्टफोलिओमध्ये ३० पेक्षा जास्त मल्टी बॅगर्सचा अतुलनीय ट्रॅक रेकॉर्ड त्यांनी हायलाइट केला आहे, यात भारत पे, बिअर्डो, पीसेफ आणि फाइंड यांचा समावेश असून या स्टार्टअप्समध्ये व्हीकॅटने सीड स्टेजमध्ये गुंतवणूक केली आहे.

सॉफ्टबँक समर्थित ओयो रुम्समध्ये एंजल गुंतवणूकदार असलेले डॉ. अपूर्व रंजन शर्मा म्हणाले, “ भारतीय उद्योजकांवर पैसा लावण्यासाठी सध्याचा सर्वात चांगला काळ आहे. भारतात तसेच जगाच्या विविध भागात निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या स्टार्टअप्समध्ये वाढ होत असल्याचे आम्ही पाहत आहोत. नजीकच्या काळात भारतातील युनिकॉर्नची संख्या चार पटींनी वाढेल आणि आजच्या ३६ वरून ही संख्या १४० च्या पुढे जाईल.”

भारतात, पहिल्या फेरीत वाढताना बहुतेक स्टार्टअप्स संघर्ष करत असतात. भांडवलासाठी ते बहुतांश वेळा कुटुंबीय आणि मित्रांवर अवलंबून असतात. विशेषत: मुंबई, बंगळुरू आणि नवी दिल्लीतील गुंतवणुकदारांच्या नेटवर्कमध्ये संस्थापक नसतील, तेव्हा ही स्थिती असते. 9यूनिकॉर्न्स ला या स्टार्ट-अप्ससाठी ‘फ्रेंड्स व फॅमिली बनण्याचा आमचा उद्देश आहे. त्याचे वेगळेपण म्हणजे, भारतातील व्यवसायिक समुदायाच्या विशाल नेटवर्कमध्ये प्रवेश करण्याकरिता स्टार्टअप्सला याद्वारे मदत केली जाते. तसेच भारतभरात वेगाने विकसित होण्यासाठीही मदत मिळते.

9यूनिकॉर्न्सने एकूण ३०० कोटी रुपयांचे (४२ दशलक्ष डॉलर) उद्दिष्ट ठेवले आहे. यात इतर निधी अनेक स्रोतांकडून मिळवला जात आहे. यात पहिल्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी दहापेक्षा जास्त देशांचे कॉर्पोरेशन, फॅमिली ऑफिस आणि संस्थांचा सहभाग आहे. प्रति स्टार्ट-अप ५-७ टक्के इक्विटीसाठी १ लाख अमेरिकी डॉलर देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. तीन महिन्यांच्या अॅक्सलरेशन प्रोग्राममध्ये त्याना यशस्वी संस्थापकांचे मार्गदर्शन मिळेल. काम करणारे स्टार्ट-अप ५ लाखांपासून २ दशलक्ष रुपयांपर्यंत मिळणा-या फॉलो-ऑन राउंडसाठी पात्र ठरतील, याचे फंडिंग व्हीकॅट्स नेटवर्क आणि ग्लोबल व्हीसी फंड्सच्या सिंडिकेटद्वारे केले जाईल. हे फंड्स एखाच्या विशिष्ट क्षेत्रावर केंद्रीत नसतील तसेच भारतीय स्टार्टअप्साठी तयार करण्यात आले आहेत.

Exit mobile version