भारत आणि भूतानलगतच्या सीमेवरील भाग बळकावण्याचा चीनचा प्रयत्न – अमेरिका
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात तसंच भारत आणि भूतानलगतच्या सीमेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन जबरदस्तीनं तो भाग बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, असं अमेरिकेचं संरक्षण खातं, पेंटॅगॉननं म्हटलं आहे. दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात चीन हेतूपूर्वक प्रदेशिक वाद उकरून काढत आहे.
तो भाग आपल्या वर्चस्व ठेवण्यासाठी चीननं या समुद्रातल्या आपल्या ताब्यात असलेल्या बेटांवर सैन्याची जमवाजमव केली आहे. हा संपूर्ण प्रदेश खनिजं, तेल आणि इतर नैसर्गिक साधन संपत्तीनं समृद्ध असून जागतिक व्यापाराच्या दृष्टीनंही ते मोक्याचं ठिकाण आहे, असं पेंटॅगॉनच्या चीनच्या लष्करी हालचालींसदर्भातल्या अहवालात म्हटलं आहे.