सोने, कच्चे तेल, तांबे आणि बेस मेटलची मागणी व किंमतही वाढली
Ekach Dheya
मुंबई : कमकुवत अमेरिकी डॉलरमुळे जगभरातील कमोडिटी बाजारावर परिणाम केले. कमोडिटी व्यापारात गुंतवणुकदारांच्या भावनांवर परिणाम करणाऱ्या इतर कारकांमध्ये चिनी अर्थव्यवस्थेची अपेक्षेपेक्षा जास्त सुधारणा तसेच अमेरिका व चीनदरम्यान जिओपॉलिटिकल तणाव यांचा समावेश असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने: मंगळवारी, अमेरिकेतील कारखान्यांची आकडेवारी चांगली येऊनही अमेरिकी डॉलरचे मूल्य घसरले. परिणामी स्पॉट गोल्डचे दर ०.०२ टक्क्यांनी काहीशा उच्चांकांवर गेले. हे दर १९७०.१ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. अमेरिकी डॉलर दोन वर्षांतील निचांकी स्तरावर आहे, त्यामुळे इतर चलनधारकांसाठी सोने अधिक स्वस्त झाले.
कमकुवत अमेरिकी डॉलर, कमी व्याज दर, व्यापक मदत योजनांची आशा आणि अमेरिका-चीनदरम्यानच्या वाढत्या तणावामुळे गुंतवणुकदारांना पिवळ्या धातूकडे आकर्षित केले. नव्या ऑर्डर वाढल्याने अमेरिकी कारखान्यांतील कामकाजात मागील महिन्यात वाढ झाली. इन्स्टिट्यूट ऑफ सप्लाय मॅनेजमेंट (आयएसएम) च्या अहवालानुसार, अमेरिकी कारखान्यांची आकडेवारी ऑगस्ट २०२० मध्ये ५६ एवढी होती तर जुलै २०२० मध्ये ती ५४.२ वर होती. ऑगस्ट महिन्यातही चीनमधील कारखान्यातील कामकाज एक दशकापेक्षा जास्त वेगाने वाढले, यामुळे सेफ हेवन म्हणजेच सोन्याची मागणी घटली.
कच्चे तेल: डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाचे दर मंगळवारी ०.३५ टक्क्यांच्या तेजीसह ४२.८ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. यासाठीच्या कारकांमध्ये अमेरिकेतील वेगाने कमी होणारा कच्च्या तेलाचा साठा, अमेरिकेतील चांगली फॅक्टरी आकडेवारी यांचा समावेश आहे. कमकुवत अमेरिकी डॉलरने कच्च्या तेलाच्या किंमतींना आधार दिला.
ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिका आणि चीनच्या निर्मिती प्रक्रियेत सुधारणा झाल्याने मागणीच्या शक्यतांना आधार मिळाला. चीनच्या कॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्सने वाढत्या निर्यातीसह कारखान्यातील कामकाजात वृद्धीचे संकेत दिले. ओपेक आणि सहका-यांनी ऑगस्ट २०२० नंतर दैनंदिन उत्पादन कपात ९.७ दशलक्ष बॅरलवरून ७.७ दशलक्ष बॅरलवर करण्याचा निर्णय घेतला. मात्र जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात अनिश्चित मागणीमुळे तेलाचा नफा मर्यादित राहिला.
बेस मेटल्स: लंडन मेटल एक्सचेंज (एलएमई) वर मंगळवारी बेस मेटलच्या किंमतींना अमेरिका व चिनी फॅक्टरी आउटपूट वाढल्याने लाभ मिळाला. यामुळे औद्योगिक धातूंचे आउटलुकही बदलले. चीनमधील कारखान्यातील कामकाजात फेब्रुवारी २०२० नंतर सलग वृद्धी दिसून येत आहे.
एका खासगी सर्व्हेनुसार, चीनचे निर्मिती क्षेत्र मागील महिनन्यात एक दशकात सर्वाधिक वेगाने वाढत आहे. चीनचे पायाभूत सुविधा केंद्रित प्रोत्साहनपर पॅकेज तसेच निर्मिती आणि सेवा क्षेत्रात स्पष्ट सुधारणेने २०२० च्या सुरुवातीच्या महिन्यांत घसरणीनंतर औद्योगिक धातूंच्या किंमती वाढल्या आहेत. चीनमध्ये स्टील वापरणारे प्रमुख भाग कोव्हिड-१९ च्या मंदीनंतर पूर्णपणे सुधारले आहेत. यामुळे स्टीलची मागणी वाढली. चीनच्या स्टेनलेस स्टील उत्पादनात वृद्धीने जस्त आणि निकेलच्या किंमतींना आधार दिला.
तांबे: मंगळवारी एलएमई कॉपरचे दर ०.३१ टक्क्यांनी वाढून ६६८७.५ डॉलर प्रति टनांवर बंद झाल्या. एलएमई प्रमाणित गोदामांमधील साठ्यात घसरण, कमकुवत डॉलर आणि चीनमधील मजबूत आकडेवारीने तांब्याच्या किंमतींना आधार दिला. जुलै २०२० मध्ये चिलीचे तांबे उत्पादन ४,६७,९१३ टन होते, ते एक वर्षापूर्वीच्या तुलनेत ४.६ टक्के कमी होते.