पितृपक्षात श्राद्धासाठी माय ओमनामो अँपद्वारे ऑनलाईन पूजेला मागणी
Ekach Dheya
मुंबई : हिंदु धर्मीयांसाठी महत्त्वाच्या असणार्या पितृपक्षाला सुरवात झाली आहे. यंदा भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सार्याच सण-समारंभ, सांस्कृतिक वा धार्मिक कार्यक्रमांवर बंधनं घालण्यात आली आहेत. यंदा भाद्रपद कृष्णपक्षाच्या पितृपंधरवड्यावर देखील त्याच सावट आहे त्यामुळे ऐरवी तलावाच्या किंवा पवित्र स्थळी जाऊन पिंडदानाचा होणारा कार्यक्रम यंदा घरगुती स्वरूपातच केला जाणार आहे. यामुळे लोकांनी ऑनलाईन पूजेला जास्त प्राधान्य दिले आहे. मुंबई स्तिथ, अध्यात्मिक अँप माय ओमनामोने व्हर्चुवल श्राद्धविधी पूजा करून लोकांना दिलासा मिळत आहे.
माय ओमनामो अँपद्वारे तुम्ही सगळ्या पूजा बुकिंग करू शकता त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये आता श्राद्ध बुकिंग करू शकता. वेगवेगळे श्राद्ध वेगवेगळ्या दिवसासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन ब्राम्हण बुक करणे, वर्षश्राद्ध,श्राद्धविधी,भरणी श्राद्ध ,सर्वपित्री अमावास्या,ब्राम्हण भोजन अश्या सर्व पूजा माय ओमनमो अँपद्वारे आता होत आहे.
माय ओमनामोचे संस्थापक मकरंद पाटील यांनी सांगितले की,” पितृपक्षात ब्राम्हण मिळणे कठीण असते पण आता माय ओमनमो अँपद्वारे श्राद्धासाठो वेळेत ब्राम्हण मिळणे सोपे झाले आहेत. यंदा पहिल्यांदाच आम्ही ऑनलाईन ब्राम्हण भोजनाची सुरवात केली आहे. यंदाच्या गणपती उत्सवात देखील आम्ही ओनलाईन ब्राह्मण भोजन पूजा केल्या. हे ब्राम्हण देशातील ३५ वेदिक पाठशाळेतील आहेत. ह्या ३५ वेदिक पाठशाळेशी आम्ही जोडले आहोत.भरणी श्राद्ध ,सर्वपित्री अमावास्या या दिवशी सर्वाधिक ब्राह्मण भोजन केले जातात जसे गणेशोत्सवात ऑनलाईन पूजेची बुकिंग होती तशीच आता पितृपक्षातही बुकिंग चालू आहे.” माय ओमनमो गूगल प्ले स्टोरवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.
गणेशोत्सवात ९६० व्हर्चुवल पूजा या अँपद्वारे करण्यात आल्या. यामध्ये गणेश पूजा गौरी पूजा उत्तर पूजा यांचा समावेश होता तसेच ३१२ ऑफलाइन पूजा, ७८ गणपती आवर्तने, १९२ सत्यनारायण पूजा केल्या. ह्या काळात त्रंबकेश्वर व नाशिकहून पुरोहित बोलावले होते. गणेशोत्सवाच्या वेळी सुमारे २५० पंडित कार्यरत होते.