Site icon साप्ताहिक एकच ध्येय

श्रीलंका आणि नेपाळमधल्या घडामोडींवर भारताने बारकाईने लक्ष द्याव – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन भारतीय उपखंडाला चोरपावलांनी विळखा घालण्याण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे श्रीलंका आणि नेपाळ इथल्या घडामोडींवर भारतानं बारकाइनं लक्ष द्यायला हवं, असं प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ट्वीटर संदेशात केलं आहे.

पुर्व लदाख मधे भारतीय आणि चिनी सैन्यामधे सुरू असलेल्या तणावपुर्ण वातावरणाच्या पार्श्वभुमीवर माजी परराष्ट्र सचीव विजय गोखले आणि माजी हवाईदल प्रमुख भुषण गोखले यांचं व्हिडिओ कॉंफरंसिंगच्या माध्यमातून विशेष चर्चेचं आयोजन केलं होतं.

त्या दरम्यान त्यांनी ट्वीट केलं. भारताची आर्थिक प्रगती रोखण्यासाठी चीन ज्या पद्धतीनं राजकीय आणि धोरणात्मक व्युहरचना आखत आहे, ते फार चिंताजनक आहे, असंही ते म्हणाले.

Exit mobile version