Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत सदानंद गौडा यांच्या हस्ते आठ नैसर्गिक पोषकद्रव्यांचे उद्‌घाटन जनऔषधी केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध

नवी दिल्ली : केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांच्या हस्ते आणि प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत, रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आठ नैसर्गिक पोषक औषधांचे उद्‌घाटन झाले. ही सर्व औषधे, जनऔषधी केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध राहतील.

कोविड-19 या साथीच्या आजाराच्या काळात, या नैसर्गिक औषधांचा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होईल, असे यावेळी बोलतांना गौडा यांनी सांगितले.या सर्व औषधांची गुणवत्ता चांगली असून बाजारातील इतर उत्पादनांच्या तुलनेत त्यांची किंमत मात्र 26 टक्क्यांनी कमी आहे. जनऔषधी केंद्रांच्या व्यापक जाळ्यामुळे ही उत्पादने अधिकाधिक  लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, त्याद्वारे, निरोगी आयुष्यशैलीविषयी लोकांना प्रोत्साहन दिले जाईल, असा विश्वास गौडा यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार लवकरच आणखी काही नैसर्गिक पोषणद्रव्ये-जसे की पोषक पूरक गोळ्या, माल्ट-आधारित पोषक द्रव्ये, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे इत्यादींच्या वापरातून लोकांचे एकूण आरोग्य आणि पोषकद्रव्यांची स्थिती यात सुधारणा करु शकेल.

त्यापुढे ते म्हणाले, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, जनऔषधी केंद्रांचे महत्व समजावून सांगितले आहे.जनऔषधी केंद्रातून सुविधा योजनेअंतर्गत, सॅनिटरी नॅपकिन केवळ एक रुपयात विकले जातात, जेणेकरुन महिलांना त्यांच्या मासिक पाळी चा त्रास होऊ नये व स्वच्छतेची काळजी घेतली जावी, असेही पंतप्रधानांनी सांगितले होते.  या पॅडसाठी वापरल्या जाणारा  कच्चा माल हा केवळ स्वस्त नाही, तर पर्यावरण पूरकही असतो. गौडा यांनी सांगितले की ही योजना जरी 2008 साली सुरु झाली असली, तरी मार्च 2016 पर्यंत केवळ 99 दुकाने सुरु होती. मात्र नंतर पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार,या योजनेचे पुनरुज्जीवन केले गेले, त्यात औषधांची खरेदी/साठा, लॉजिस्टिक, माहिती तंत्रज्ञान अशा सर्व सुधारणा झाल्या आणि 2017 नंतर अनेक जनऔषधी केंद्रेही उघडली गेली. सध्या देशातल्या 732 जिल्हयांमध्ये  6587 केंद्र आहेत, असे गौडा यांनी संगितले.

पंतप्रधान जनऔषधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या नैसर्गिक पोषक औषधांची यादी खालीलप्रमाणे:

Details of the Nutraceutical products under PMBJP

Sr.No

Name of the Product

Pack Size

PMBJP MRP (Rs.)

Avg. MRP of top 3 branded products (Rs.)

Savings (in percentage)

1

Jan Aushadhi Poshan malt-based

1’s Screw Cap Plastic Jar 500gm

175

236

26%

2

Jan Aushadhi Poshan malt based with Cocoa

1’s Screw Cap Plastic Jar 500gm

180

243

26%

3

Protein Powder (Chocolate)

1’s Tin 250 gm

200

380

47%

4

Protein Powder (Vanilla)

1’s Tin 250 gm

200

380

47%

5

Protein Powder (Kesar Pista)

1’s Tin 250 gm

200

380

47%

6

Jan Aushadhi Janani

1’s Tin 250 gm

225

300

25%

7

Protein Bar

35 gm

40

80

50%

8

Jan Aushadhi Immunity Bar

10 gm

10

20

50%

Exit mobile version