एमओआरटीएचने यंदा एप्रिल ते ऑगस्ट कालावधीत ओलांडले राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचे लक्ष्य
Ekach Dheya
सुमारे 2700 किलोमीटर उद्दिष्ट असताना, 3100 किलोमीटरपेक्षा अधिक राष्ट्रीय महामार्ग बांधला
मागील वर्षीच्या याच काळातील 1300 किलोमीटरच्या तुलनेत, यावर्षी 3300 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांची कामे पुरस्कृत
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मागील शनिवार आणि रविवारपर्यंत देशात राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य ओलांडले आहे. या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान, 2771 किलोमीटर लांबीचे उद्दिष्ट असताना, या काळात 3181 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग बांधून झाला. यामध्ये 2104 किलोमीटर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून, 870 किलोमीटर एनएचएआयकडून आणि 198 किलोमीटर एनएचआयडीसीएलकडून यांचा समावेश आहे.
पुढे, 3300 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना यावर्षी ऑगस्टपर्यंत पुरस्कृत करण्यात आले आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीतील 1367 किलोमीटरच्या दुप्पट आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचा 2167 किलोमीटर भाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून, 793 किलोमीटर एनएचएआय कडून, आणि 341 किलोमीटर एनएचआयडीसीएल कडून समाविष्ट आहे.
या काळात देशभरातील 2983 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे 1265 किलोमीटर, एनएचआयएकडून 1183 किलोमीटर, आणि एनएचआयडीसीएलकडून 535 किलोमीटर समाविष्ट आहे.