Site icon साप्ताहिक एकच ध्येय

तणावपूर्व स्थितीतही भारतीय जवानाचं मनोबल भक्कम – लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)  : पूर्व लडाख क्षेत्रात चीनबरोबरच्या  प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर  तणावपूर्ण स्थिती असली, तरी भारतीय जवानाचं मनोबल भक्कम असून ते  कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायला सक्षम असल्याचं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे.

प्राप्त परिस्थितीत   देशाची सुरक्षा आणि एकात्मता कायम राहावी, यासाठी  लष्करानं आवश्यक ती खबरदारी घेतल्याचं त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. जनरल नरवणे यांनी काल प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या भारतीय चौक्यांना भेट देऊन भारतीय  सेनेच्या  सज्जतेचा  आढावा घेतला. गेल्या  तीन महिन्यांपासून दोन्ही देशांच्या लष्करामध्ये  असलेला तणाव दूर  व्हावा, यासाठी चीनबरोबर  लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरु असून, त्या यापुढेही सुरू राहील, असं ते म्हणाले.

चर्चमधूनच या समस्येवर तोडगा निघेल, आणि या भागात जैसे थे परिस्थिती कायम राखण्यात भारताला यश मिळेल, असं विश्वास जनरल नरवणे यांनी यावेळी  व्यक्त केला.

Exit mobile version