Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ट्रेडइंडिया भारतातील पहिला व्हर्चुअल पॅकेजिंग एक्सपो इंडिया २०२० आयोजित करणार

पॅकेजिंग उद्योगाला नव्या व्यावसायिक संकल्पना आणि नवे पैलू आजमावून पाहण्याची संधी

मुंबई : भारतातील सर्वात मोठी बीटूबी मार्केटप्लेस ट्रेड इंडिया कोव्हिड-१९ इसेन्शिअल्स एक्सपो इंडियाच्या सफल आयोजनानंतर ‘पॅकेजिंग एक्सपो इंडिया’ या व्हर्चुअल व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा मेळावा जागतिक खरेदीदारांशी डिजिटलरित्या कनेक्ट करण्यासाठी पॅकेजिंग उद्योगास एक वास्तविक प्लॅटफॉर्म मिळवून देण्यास सक्षम बनवेल. २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान व्यापारी प्रदर्शन पार पडेल.

पॅकेजिंग उद्योगात प्रामुख्याने निर्माते, पुरवठा व निर्यातदार असून त्यांना या व्हर्चुअल व्यापारी कार्यक्रमाद्वारे मोठी मदत मिळू शकते. पॅकेजिंग उद्योगातील अनेक खेळाडूंना याद्वारे त्यांची उत्पादने व सेवा व्हिजिटर्ससमोर प्रदर्शित करण्यासाठी मदत होईल. तसेच दीर्घकालीन भागीदारी टिकवण्यासाठी, पात्रता वाढवून आघाडी घेण्यासाठी तसेच वितरक नियुक्त करण्यासाठीही सहाय्यभूत ठरेल.

हा व्हर्चुअल पॅकेजिंग एक्सपो इंडिया २०२० हा भारतातील तसेच जगातील असंख्य निर्यातदार आणि निर्मात्यांना त्यांच्या विस्तृत श्रेणीतील उत्पादनांचे प्रदर्शनन करण्याकरिता उपयुक्त ठरेल. यासोबतच, आर्थिक क्रियांचे चक्र हळू हळू उत्पादनक्षमतेच्या दिशेने फिरेल, याचीही सुनिश्चिती करेल. हा व्हर्चुअल ट्रेड इव्हेंट व्यावसायिक आणि उद्योग प्रतिनिधींना त्यांच्या एकूणच सर्व कामकाजात कार्यक्षम आणि प्रभावी बनण्यास मदत करेल. तसेच मोठ्या प्रमाणात व्यवसाय मिळवून देण्यासही तो उपयुक्त ठरेल.

ट्रेडइंडियाचे सीओओ श्री संदीप छेत्री म्हणाले, “ या वर्षातील अकस्मात घडलेल्या घटनांमुळे आम्हाला नव्या संधी आणि दृष्टीकोन आजमावून पाहण्यासाठी बळ मिळाले. अगदी ज्या क्षेत्राकडे आपण पारंपरिकदृष्ट्या दुर्लक्ष केले आहे, तेथेही संधी मिळाली. अशा रितीने असंख्य शक्यता आणि आव्हानांना आमंत्रण देणारी अशी ही कोव्हिड-१९ ची साथ असून नूतनाविष्कार आणि चिकाटीनेच यावर मात करता येईल. केवळ एका प्रदर्शनाव्यतिरिक्त या व्यासपीठाद्वारे पॅकेजिंग उद्योगातील पुरवठादार आणि विक्रेत्यांना विक्रीकरिता निर्दोष बिझनेस चॅनेल म्हणूनही सेवा पुरवली जाईल.”

Exit mobile version