नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि बोलिव्हिया यांच्यात शांततापूर्ण हेतूंसाठी बाह्य अंतराळाच्या शोध आणि वापरातील सहकार्याबाबत भारत आणि बोलिव्हिया यांच्यात स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि बोलिव्हियन अंतराळ संस्था यांच्यात 29 मार्च 2019 रोजी बोलिव्हियातील सांताक्रूझ दे ला सिएरा येथे राष्ट्रपतींच्या बोलिव्हिया दौऱ्यादरम्यान या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
तपशील:-
या सामंजस्य करारामुळे अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि पृथ्वीच्या रिमोट सेन्सिंगसह वापर, उपग्रह संचार आणि उपग्रह आधारित दिशादर्शन, अंतराळ विज्ञान आणि ग्रहशोध; अंतराळयान आणि अंतराळ प्रणाली आणि ग्राउंड सिस्टमचा वापर; तसेच अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या संभाव्य क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत होऊ शकेल.
या सामंजस्य करारानुसार संयुक्त कृतीगट स्थापन होईल, ज्यामध्ये इस्रो आणि बोलिव्हियन अंतराळ संस्थेचे (एबीई) चे सदस्य असतील. ते या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्याची मुदत आणि कार्यवाही बाबत कृती आराखडा तयार करतील.
अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे:-
या सामंजस्य करारामुळे विशेष अंमलबजावणी व्यवस्था पूर्ण करणे आणि कराराच्या अंमलबजावणीची मुदत आणि पद्धतीबाबत कृती आराखडा तयार करण्यासाठी एक संयुक्त कृतिगट स्थापन करण्यात मदत होईल.
प्रमुख प्रभाव:-
या करारामुळे पृथ्वीचे रिमोर्ट सेंसिंग, उपग्रह संचार, उपग्रह दिशादर्शन , अंतराळ विज्ञान , बाह्य ग्रहीय संशोधन यासारख्या क्षेत्रात नवीन संशोधन आणि त्याचा संभाव्य वापर याचा शोध घेण्याला चालना मिळेल.
खर्च:-
प्रत्येक विशिष्ट कार्यासाठीचे वित्तीय योगदान संयुक्त उपक्रमाच्या स्वरूपावर अवलंबून असेल आणि त्याचा तपशील संबंधित अंमलबजावणी करारात दिला जाईल.
लाभ :-
या करारामुळे मानवतेच्या कल्याणासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर क्षेत्रात संयुक्त उपक्रम विकसित करता येईल. याचा लाभ देशातील सर्व घटक आणि क्षेत्रांना मिळेल.
पार्श्वभूमी:-
बोलिव्हियन अंतराळ संस्थेने डिसेंबर 2016 मध्ये बोलिव्हियातील भारतीय राजदूताना पत्राद्वारे इस्रो बरोबर अंतराळ सहकार्य स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार इसरोने 5-6 जून 2017 रोजी बोलिव्हियाच्या दोन सदस्यीय प्रतिनिधिमंडळाबरोबर पृथ्वी निरीक्षण आणि उपग्रह संचार क्षेत्रातील संभाव्य सहकार्याबाबत चर्चा केली होती. त्यांनी बंगळुरू येथील इस्रोच्या तांत्रिक सुविधाची पाहणी देखील केली होती. त्यानंतर हा सामंजस्य करार करण्यात आला.