Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुण्यात जम्बो कोविड रुग्णालयात ५० डॉक्टर आणि १२० पॅरामेडिकल कर्मचारी कार्यरत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुणे इथल्या जम्बो कोविड रुग्णालयात ५० डॉक्टर आणि १२० पॅरामेडिकल कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आणि जम्बो कोविड रूग्णालयाचे कार्यकारी अध्यक्ष रुबल अग्रवाल यांनी दिली. जम्बो सेंटरमधील डॉक्टर आणि परिचारिकांनी राजीनामा दिल्याची माहिती पसरत आहे. मात्र आधीची एजन्सी रद्द करण्यात आली आहे.

महापालिकेच्या वतीनं त्वरीत नेमण्यात आलेले सर्व डॉक्टर, कर्मचारी सेवेत रुजू आहेत, असं  अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जम्बो कोविड रुग्णालयातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. तिथे दोन कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसंच, जम्बो सेंटरमध्ये सर्व उपचार विनामूल्य केले जातील. रेमिडिसीविर इंजेक्शन्स देखील विनामूल्य दिली जातील, असेही रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

Exit mobile version