Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शिक्षणाची प्रक्रिया ‘शिक्षक केंद्री’ न होता ‘विद्यार्थी केंद्री’ व्हायला हवी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पथदर्शी आहे. या धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षणाची प्रक्रिया ‘शिक्षक केंद्री’ न होता ‘विद्यार्थी केंद्री’ व्हायला हवी अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे.

या धोरणाची अंमलबजावणी करताना सूक्ष्म व्यवस्थापनावर भर द्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे. ते आज ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणात परिवर्तन’ या विषयावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या ऑनलाई राज्यपाल परिषदेत बोलत होते. शिक्षण केवळ रोजगाराभिमुख राहू नये, तर त्यामुळे चारित्र्य संपन्न विद्यार्थीही घडायला हवेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version