Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक यांना अभिवादन

पिंपरी  :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथि निमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेविका कमल घोलप, सुमन पवळे, नगरसेवक उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, आदी उपस्थित होते.

Exit mobile version