Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोनावरच्या लसीच्या पुढच्या चाचण्या थांबवल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीच्या दरम्यान एका पुरुषावर प्रतिकूल परिणाम जाणवू लागल्यामुळे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना आजारावरील बहुचर्चीत लसीच्या पुढील चाचण्या थांबवण्याचा निर्णय ऍस्ट्राझेनेका या औषध निर्माण कंपनीनं घेतला आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठानं ऍस्ट्रा झेनेका बरोबर ही लस तयार करण्यासंदर्भात करार केला आहे. असा प्रकारे लस  निर्माण मधेच थांबवणं कधी कधी करावं लागतं यात नवीन असं काही नाही, त्यात संशोधन करून पुन्हा चाचण्यांना सुरुवात केली जाईल, असं ऍस्ट्रा झेनेकाच्या प्रतिनिधींनी सांगितलं. नुकतंच तिसऱ्या चाचणी साठी संयुक्त युरोप, अमेरिका ब्राझीलसह ३० हजार प्रतिनिधी तयार आहेत, असंही या प्रतिनिधींनी सांगितलं.

Exit mobile version