Site icon साप्ताहिक एकच ध्येय

झानाडू रिअँलिटीने आणले ब्लिस कोडनेम

रिअल इस्टेटमध्ये प्लॉट खरेदीचा नवा पॅटर्न

मुंबई : झानाडू रिअँलिटी या अग्रगण्य रिअँलिटी प्लॅटफॉर्मने ब्लिस (ब्रँड लँड इन्व्हेस्टमेंट स्टॉक्स स्कीम) हे कोडनेम आणले असून भारतीय ग्राहकांसाठी ही मोठी संधी आहे. घरीच राहून ग्राहकांना उत्तम आणि समृद्ध जमिनीचा भाग मिळेल. ‘ब्रँडेड प्लॉटेड लँड’ च्या स्वरुपातील एक क्रांतिकारी नवा मालमत्ता वर्ग खरेदीदारांसमोरील जमीन मालकीचे सर्व मूलभूत अडथळे दूर करतो.

जमीन हा मालकी हक्कांसाठीचा कायमचाच सर्वात चांगला मार्ग आहे. मात्र खरेदी प्रक्रियेतील दुर्बोधतेमुळे उच्च पातळीवरील जोखीम पत्करणे कठीण आहे. त्यामुळेच एका सोप्या आणि पारदर्शी संधीद्वारे हे सांगण्यात आले आहे. ही योजना अशा प्रकारे तयार केली आहे की, एखाद्याला मालमत्ता वर्गात स्वत:ची जमीन विकत घ्यायची असेल तर तो सहजपणे घेऊ शकेल.

ब्लिसने भारताच्या एकमेव किनारपट्टीवरील हिल स्टेशन असलेल्या दापोली येथे नयनरम्य रहिवासी समुदायात लाइफस्टाइल प्लॉट्स विक्रीसाठी सादर केले आहेत. पुणे आणि मुंबईवरून फक्त ५ तासांच्या अंतरावर असलेले दापोली हे कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे. कोकण किना-यावरील अलिबागनंतरचे हे मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल, असा अंदाज आहे.

ही संपूर्ण डिजिटलाइज्ड विक्री प्रक्रिया असून पूर्णपणे स्वयंचलित आहे. देश-विदेशातील खरेदीदार याकडे आकर्षित होत कारण पसंतीचे प्लॉट्स आरक्षित करण्याची प्री-बुकिंग प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. २५०० चौरस फुटांचे प्लॉट्स ९.९० लाख रुपये किंमतीला असून ग्राहक पहिल्या रकमेवर सहजपणे प्री-बुक करू शकतात.

झानाडू रिअँलिटीचे संचालक श्री सॅम्युज्वल घोष म्हणाले, “भारतात ग्राहकांदरम्यान जमीन खरेदीचे लोकशाहीकरण करणे, हा आमचा उद्देश आहे. जमीन मालकीतील सर्व अडथळे दूर करत भारतातील सर्वात सुरक्षित मालमत्ता आणण्याचे आम्ही ठरवले आणि हे बीएलआयएसएस या कोडनेमद्वारे या योजनेची सुरुवात केली. योजनेअंतर्गत, या पातळीवरील विकासात गुंतवणूक करण्याची दुर्मिळ संधी दिली जात आहे.”

Exit mobile version