Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जेईई मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय चाचणी संस्थेनं विक्रमी चारच दिवसात जेईई मुख्य परीक्षेचे निकाल काल जाहीर केले आहेत. या परीक्षेत 24 उमेदवारांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले असून यामध्ये तेलंगणमधील उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे.

दिल्लीतल्या 5, राजस्थानातील 4, आंध्र प्रदेशातील 3, हरियानातील 2 आणि गुजरात आणि महाराष्ट्रातील एका उमेदवारांचाही या यादीत समावेश आहे. कोरोना संसर्गस्थितीमुळे जेईई मुख्य परीक्षा दोन वेळेस पुढे ढकलण्यात आली होती. नंतर मात्र 2 ते 6 सप्टेंबर या कालावधीत देशभरातल्या 232 शहरांमधील 660 केंद्रांवर ही परीक्षा विनाअडथळा आयोजित करण्यात आली होती.

Exit mobile version