Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार दाद मागणार असून यासाठी मराठा समाजानं कोरोनाच्या काळात रस्त्यावर येऊन आंदोलनं करु नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार वाढत असून दुसरी लाट आली आहे की काय असं वाटत आहे.

कोरोना प्रसार रोखणं ही सगळ्यांचीच जबाबदारी झाली असून त्यासाठी राज्यभरात येत्या 15 तारखेपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबवण्यात येणार असल्याच प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं.

ते जनतेला उद्देशून आज दुपारी केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते. मास्क, हात धुणे आणि शारिरीक अंतर पाळणे ही त्रिसूत्री पाळण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. ज्यांना बाहेर जाणे आवश्यक आहे त्यांनी घरात आल्यानंतर स्वताची स्वच्छता करूनच घरात येण्याची जबाबदारी पार पाडावी असंही ते म्हणाले. राज्यातल्या सगळ्यांचीच तपासणी करणं अवघड असली तरी राज्यभरात आरोग्याची चौकशी करण्याची मोहिम ही मुंबईतल्या चेस द व्हायरस या मोहिमेच्या धर्तीवर राबवण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.

या साठी आठवड्यातून दोनदा घरोघरी जाऊन लोकांची चौकशी करण्यात येईल त्यात कोणाला काही लक्षणं आढळल्यास आरोग्य विभाग पुढे कार्यवाही करेल असंही त्यांनी सांगितलं. याची जबाबदारी वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या लोकप्रतिनिधींनी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. जीवनसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रवासात न बोलण्याच आवाहन करत संपर्क टाळणे आवश्यक असल्यावरही त्यांनी भर दिला. या कामी जनतेनं सहकार्य करावं आणि पुन्हा टाळेबंदी लावण्याची वेळ येऊ नये असंही त्यांनी सागितलं. राज्यातल्या साडेएकोणतीस लाख  शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात सरकारला यश आल्याचं सांगत आता शेतकऱ्यांसाठी विकेल ते पिकेल या योजनेद्वारे हमी भाव नाही तर हमखास भाव देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या आजच्या संदेशात राजकीय विषय घेतला नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केलेली मोठ्या खंडपिठाकडे सुनावणी घेण्याची मागणी मान्य झाली असली तरी सर्वोच्च न्यायालयानं अनपेक्षितपणे अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. त्याबाबत न्यायालयात दाद मागण्यासाठी प्रयत्न सुरू असून तो पर्यंत मराठा समाजाने गैरसमज न करून घेता या कोरोनाच्या काळात रस्त्यावर येऊन आंदोलनं करु नये असंही ते म्हणाले. तूमची जी भावना आहे तीच सरकारची आहे. असंही ते म्हणाले. सरकार तूमच्यासाठी भांडत असून राज्यात आरक्षण देण्याचा निर्णय हा एकमताने घेण्यात आला होता याच आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या या संदेशात लोकांनी बाळगलेल्या संयमाबद्द त्यांचे आभार मानले असून कोरोनाला घाबरु नये मात्र कोणीही शिथिलताही बाळगू नये असं आवाहन केलं.

Exit mobile version