Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी आज लेह, लडाख येथे 12 कोटी रुपये खर्चाच्या विविध क्रीडा सुविधांची पायाभरणी केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय युवक कल्याण आणि  क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी आज लडाखचे नायब राज्यपाल  आर. के. माथुर यांच्या उपस्थितीत लेह, लडाख येथे 12 कोटी रुपये खर्चाच्या विविध क्रीडा  सुविधांची पायाभरणी केली. त्यांनी  लेहट ओपन स्टेडियममध्ये फुटबॉलसाठी सिंथेटिक ट्रॅक व अ‍ॅस्ट्रोटर्फसाठी पायाभरणी केली. याचा अंदाजे खर्च  10.68 कोटी आहे आणि जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे एनडीएस इनडोअर स्टेडियममध्ये व्यायामशाळा हॉल बांधण्यासाठी सुमारे 1.52 कोटी रुपये असून मार्च 2021 पर्यंत हे बांधकाम पूर्ण होईल.

यावेळी बोलताना किरेन रिजिजू म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार देशात एक क्रीडा संस्कृती रुजवत  आहे आणि यामुळे लोकांना निरोगी व तंदुरुस्त ठेवत आहेत. ते म्हणाले की त्यांचे मंत्रालय क्रीडा संस्कृतीला धोरणात्मक चौकटीत बसवण्याचा विचार करत आहे. मंत्री म्हणाले की, देशातील विविध ठिकाणी खेलो इंडिया, विद्यापीठ स्तरीय स्पर्धा आणि हिवाळी खेळ विद्यार्थी व युवकांना क्रीडा प्रकारात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. क्रीडामंत्र्यांनी खेळाच्या महत्वावर भर दिला आणि जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न अधोरेखित केले.

15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या दीड महिन्यांच्या कालावधीत फिट इंडिया फ्रीडम रन चा भाग म्हणून, क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी खासदार  जमयांग नामग्याल आणि स्थानिक सायकल चालकांसह आज सकाळी वैयक्तिकरित्या सायक्लोथॉनमध्ये भाग घेतला होता.

Exit mobile version