भारतीय जनसंसदेची पिंपरी येथे बैठक : पिंपरी चिंचवड कार्यकारिणी जाहिर
Ekach Dheya
पिंपरी : भारतीय जनसंसदेच्या पिंपरी चिंचवड कार्यकारिणी व पुणे कार्यकारिणीचे चर्चासत्र रविवारी दुपारी १२ ते २ या वेळात बॅडमिंटन हॉल, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सदर मीटिंगमध्ये भविष्यात कोणते कार्यक्रम प्राधान्याने हाती घ्यायचे, याविषयी गांभीर्याने विचार विनिमय करण्यात आला. राज्य कार्यकारिणीचे विषय व स्थानिक मुद्दे विचारात घेऊन, भविष्यात जनसामान्यांसाठी संघर्षरुपी चळवळ उभी करण्यात येईल. कोणतीही संघटना समाजाच्या तळाशी पोहोचली की यशस्वी होते असे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ॲड. मोहन अडसूळ यांनी सांगितले.
यावेळी राज्य सरचिटणीस अप्पा कोंढाळकर व एस.टी. बँक व्यवस्थापक (निवृत्त) श्री. अरविंद कापसे यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास पुणे कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री. निलेश काची, राजूशेठ अग्रवाल, महिला अध्यक्षा संपदा बामणे, पिंपरी चिंचवडचे उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव, ईश्वरीताई थोरात, विजय शहापूरकर, सुप्रिया काटे, पुष्पा टेकाडे, शेषनारायण खंकाळ, श्री.मधुसुदन पाडळे व इतर जनसमुदाय उपस्थित होता. तसेच पिंपरी चिंचवड कार्यकारणीची नियुक्तीपत्रे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष ॲड.मोहन अडसूळ यांनी केले. तर आभार श्री. अशोक काळे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी रविराज मांडवे, विनय शिंदे व जयश्री अडसूळ यांनी परिश्रम घेतले.
पिंपरी-चिंचवड कार्यकारणी
श्री.मोहन अडसूळ शहराध्यक्ष, श्री.दत्तात्रय जाधव उपाध्यक्ष, श्री.महेश आनंदा लोंढे सरचिटणीस, श्री.ज्ञानेश्वर मलशेट्टी सहसरचिटणीस, सौ.ईश्वरीताई थोरात सहसरचिटणीस, श्री.विजयराव शहापूरकर खजिनदार, श्री.विनय शिंदे सहखजिनदार, सौ.सुप्रियाताई काटे सहखजिनदार, श्री. अशोक काळे लेखापाल (तळेगाव, मावळ), श्री.रविराज मांडवे सहलेखापाल, सौ.पुष्पाताई टेकाडे सदस्या, सौ.जयश्रीताई अडसूळ सदस्या, सौ.सुजाताताई काटे सदस्या, श्री.शेषनारायण खंकाळ सदस्य, श्री.मधुसुदन पाडळे सदस्य या नियुक्ता महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अप्पा कोंढाळकर यांनी केल्या.