Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात सिटीस्कॅन चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी चार सदस्यीय समितीची नेमणूक – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सिटीस्कॅन चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागानं चार सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील ही समितीला सात दिवसात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भातला शासन निर्णयदेखील आज जारी करण्यात आला.

कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी सिटीस्कॅन चाचणीची देखील आवश्यकता भासते. खासगी रुग्णालयं तसंच सिटीस्कॅन केंद्रांकडून अवाजवी रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं या चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं.

डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सायन रुग्णालयाच्या रेडीऑलॉजी विभाग प्रमुख डॉ.अनघा जोशी, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता,  हे सदस्य असून आरोग्य समितीचे संचालक या समितीत सदस्य सचिव आहेत. चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी ही समिती खासगी रुग्णालयं आणि एचआरसीटी चाचणी केंद्रांशी चर्चा करुन अहवाल सादर करणार आहे.

Exit mobile version