Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विमानतळांवर स्वॅब चाचणी करण्याची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सुलभता यावी या उद्देशानं विमानतळांवर कोविड-१९ ची आरटीपीसीआर चाचणी करण्याची परवानगी केंद्र सराकरनं प्रायोगिक तत्वावर दिली आहे. अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदिप सिंग पूरी यांनी राज्य सभेत लेखी उत्तरांत दिली.

विमान कंपनी प्रवाशांचे नमुने गोळा करुन ते चाचणीसाठी पाठवतील. या चाचणीचा अहवाल प्राप्त होईतोवर प्रवाशी विमानतळावर वाट पाहू शकतात अथवा आपल्या हॉटेल अथवा राहण्याच्या ठिकाणी विलगीकरणांत राहू शकतात. असंही त्यांनी सांगितलं.

चाचणी चा अहवाल येईतोवर या प्रवाशांचं पारपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांचे अहवाल पॉझिटिव्ह येतील त्यांना आयसीएमआरच्या पोटोकॉलनुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करावं लागेल.

Exit mobile version