Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पंतप्रधान आणि युक्रेनच्या राष्ट्रपतींनी केली दूरध्वनीवरुन चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्रपती ब्लोदीमीर झेलेंस्की यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.

युक्रेनच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झेलेंस्की यांच्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. युक्रेनमधे नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत झेलेंस्की यांच्या सर्व्हर ऑफ पीपल पार्टीने मिळवलेल्या यशाबद्दलही पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.

व्यापक जनादेश मिळवत पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान झाल्याबद्दल, झेलेंस्की यांनी पंतप्रधानांचे  अभिनंदन केले.

भारत आणि युक्रेन यांच्यात मैत्रीपूर्ण आणि सौहार्दाचे संबंध असून द्विपक्षीय व्यापारी संबंधात समाधानकारक गतीने वाढ होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. युक्रेनबरोबर इतरही अनेक क्षेत्रात दीर्घकालीन संबंध असल्याचे अधोरेखित करत युक्रेनमधल्या विविध विद्यापीठात मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी असल्याने दोन्ही देशादरम्यान जनतेतले परस्पर संबंध अधिक दृढ होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या संबंधाना प्रोत्साहन आणि किव्ह ते दिल्ली दरम्यान गेल्या वर्षीपासून थेट विमानसेवेमुळे पर्यटनाला चालना मिळाल्याची दखलही त्यांनी घेतली.

परस्पर हिताचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठी काम करायला दोन्ही नेत्यांनी तयारी दर्शवली.

Exit mobile version