पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 3 लाख 58 हजार 705 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव
Ekach Dheya
पुणे:- पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 705 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या78 हजार 690 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 9 हजार 282 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.48 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 40 हजार 423 रुग्णांपैकी 1 लाख 92 हजार 771 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 312 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 340 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.22 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.18 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण27 हजार 363 रुग्णांपैकी 17 हजार 777 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 803 आहे. कोरोनाबाधित एकूण 783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 27 हजार 21 रुग्णांपैकी 18 हजार 632 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 396 आहे. कोरोनाबाधित एकूण 993 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 26 हजार 681 रुग्णांपैकी 16 हजार 191 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 486 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 37 हजार 217 रुग्णांपैकी 25 हजार 362 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 693 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 162 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 7 हजार 859 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात4 हजार 571, सातारा जिल्ह्यात 915, सोलापूर जिल्ह्यात 631, सांगली जिल्ह्यात 1 हजार 28 तर कोल्हापूर जिल्ह्यात 714 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 15 लाख 73 हजार 157 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 58 हजार 705 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 17 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )