Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एप्रिल 2020 मध्ये अंमलात येणाऱ्या बीएस-6 उत्सर्जन निकषातून लष्कर/निमलष्करी दलाच्या विशेष वाहनांना वगळले

नवी दिल्ली : 1 एप्रिल 2020 पासून अंमलात येणाऱ्या नव्या वाहन उत्सर्जन निकष बीएस-6 मधून भारतीय लष्कराच्या आणि निमलष्करी दलाच्या विशेष गाड्यांना वगळ्यात आल्याची अधिसूचना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 ऑगस्टला जारी केली आहे. या वाहनांना बीएस-4 मधूनही सवलत देण्यात आली आहे.

ही वाहने अत्यंत दुर्गम आणि आव्हानात्मक परिस्थितीत चालवली जातात. संरक्षण विषयक आव्हाने आणि आवश्यकतांमुळे अशा वाहनांमध्ये योग्य ते इंजिन विकसित करण्यासाठी आणखी काळ लागणार आहे. त्याचबरोबर इंधनाची आणि वाहतुकीची आदर्श स्थिती राखणेही या वाहनांसाठी कठिण असल्याचे लक्षात ठेवून त्यांना ही सवलत देण्यात आली आहे.

Exit mobile version