राज्यातील रेस्टॉरंटना करातून किमान वर्षभरासाठी सूट मिळावी- पश्चिम भारत हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटना
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना काळात होत असलेल्या नुकसानीतून दिलासा मिळावा यासाठी राज्यातल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटना सर्व प्रकारच्या करातून किमान वर्षभरासाठी सूट मिळावी, अशी मागणी पश्चिम भारत हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेनं केली आहे.
मुंबई महापालिकेनं हॉटेल आणि रेस्टॉरंटना तीन महिन्याच्या मालमत्ता करात सूट दिली आहे. ही सवलत ६ महिन्यापर्यंत वाढवण्याची मागणीही संघटनेनं केली आहे. सद्याच्या परिस्थिती हॉटेल उद्योगाला पुन्हा उभारी येण्यासाठी वर्ष ते दीड वर्ष लागणार असल्याचं, संघटनेचे अध्यक्ष गुरुबक्षीश सिंग कोहली यांनी सांगितलं.