मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीनं काल छत्रपती शिवाजी आंतरदेशीय विमानतळ स्थानक इथं भुयारीकरणाचा ३१ वा टप्पा पार पडला. पॅकेज-६ च्या टेराटेक निर्मित तापी – १ या टनेल बोअरिंग मशिनने सहार ते आंतरदेशीय विमानतळपर्यंतचा दीड किलो मीटर अंतर ४४९ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं.
स्थानकाचं एकूण ५५ टक्के काम पूर्ण झालं आहे आंतरदेशीय विमानतळ हे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील सर्वात महत्त्वाचं स्थानक आहे. या स्थानकावरून दररोज एक लाखापेक्षा अधिक प्रवासी प्रवास करण अपेक्षित आहे.