Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘अभ्यास’ ड्रोनच्या उड्डाणाची चाचणी यशस्वी

नवी दिल्‍ली : हीट-अर्थात हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट साधणा-या ‘अभ्यास’या ड्रोनच्या उड्डाणाची चाचणी आज यशस्वी झाली. डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्यावतीने  ओडिशातल्या बालासोर इथल्या अंतरिम तळावर ही चाचणी घेण्यात आली. यावेळी दोन निदर्शक वाहनांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या ड्रोन-वाहनाचा उपयोग विविध क्षेपणास्त्र यंत्रणेचे मूल्यांकन करण्यासाठी लक्ष्य म्हणून करण्यात येवू शकतो.

‘अभ्यास’ ड्रोनची रचना आणि विकास कार्य एरोनॉटिकल डेव्हलमेंट एस्टॅब्लिशमेंटने (एडीई) केले आहे. या हवाई वाहनासाठी व्टिन अंडरलंग बूस्टरचा वापर करण्यात आला आहे. लहान गॅस टर्बाइन इंजिनाच्या मदतीने हे उडते. तसेच मार्गदर्शन आणि नियंत्रणासाठी फ्लाइट कंट्रोल कंम्प्यूटर (एफसीसी) बरोबरच एमईएमएस आधारित इनर्शल नेव्हिगेशन सिस्टिम (आयएनएस) यामध्ये बसविण्यात आली आहे. या वाहनाच्या उड्डाणाचे ‘प्रोग्रॅमिंग’ स्वतंत्रपणे करण्यात आले आहे. या हवाई वाहनाची (ड्रोनची) सर्व कार्यप्रणाली लॅपटॉपच्या मदतीने जीसीएसवरून ऑपरेट केली जात आहे.

या चाचणीच्या दरम्यान वापरकर्त्याने  हे ड्रोन 5किलोमीटर उंचीवर नेणे आवश्यक होते, तसेच 0.5 मॅक इतका वाहनाचा वेग गाठणे गरजेचे होते, या दोन्ही चाचण्यांमध्ये वाहन यशस्वी ठरले. तसेच 30 मिनिटांच्या उड्डाणासाठी वाहनामध्ये 2जी टर्न क्षमता असावी लागते, ही चाचणीही आज ‘अभ्यास’ ड्रोनने पूर्ण केली.

Exit mobile version