Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पीक पाहणी अॅपमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील, तसंच त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालासाठी योग्य भाव आणि बाजार मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

पीक सर्वेक्षणासाठी विकसित केलेल्या अॅपबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल त्यांच्या सरकारी निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीला बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दादा भुसे, अब्दुल सत्तार या मंत्र्यांबरोबरच अनेक वरिष्ठ अधिकारी आणि ज्यांच्या सहकाऱ्यानं अॅप विकसीत केलं आहे, त्या टाटा ट्रस्टचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

या अॅपद्वारे शेतकरी त्यांच्या पिकांची छायाचित्रे अपलोड करू शकतात, असं यावेळी सांगण्यात आलं.

Exit mobile version