Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नाशिकमध्ये टपाल विभागातल्या गुंतवणूकीवर कोणताही परीणाम नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे आर्थिक उलाढाल मंदावली असली तरी नाशिकमध्ये टपाल विभागात गुंतवणूकीवर कोणताही परीणाम झालेला नाही. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत नाशिक जिल्ह्यात ३८ हजार २०२ खाती उघडण्यात आली असून त्यात ९३७ कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे.

मुदतठेवीच्या स्वरूपात २ हजार १०३ ज्येष्ठ नागरीकांनी १२४ कोटी गुंतवणूक केली आहे. लॉकडाऊन काळात टपाल विभागानं  ‘पोस्टमन तुमच्या दारी’ या सह  अन्य मोहिमा राबविल्या होत्या. त्यामुळे टपाल खात्याच्या आर्थिक व्यवहाराचीविश्वासार्हता वाढली आहे.

Exit mobile version