Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते “डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट-2020” चे उद्या उद्घाटन

कोविड-19 नंतर ईशान्य प्रदेश पर्यटन आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून उदयाला येणार-डॉ जितेंद्र सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे ईशान्य परिषदेचेही अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते “डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट-2020” चे आभासी पद्धतीने उद्या उद्घाटन करण्यात येणार आहे. डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट, ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाचा एक नियमित कार्यक्रम असुन ज्यायोगे ईशान्येकडील प्रदेशाची इतर भागांना ओळख करुन देणे आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी त्यांना जवळ आणणे हा उद्देश आहे. ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंग यांची कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे.

डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट 2020, ची संकल्पना “उदयोन्मुख आनंददायी ठिकाण” ही आहे. ज्यामाध्यमातून पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मुख्यतः पर्यटनावर केंद्रित आहे आणि 27 सप्टेंबर 2020 रोजी येणार्‍या ‘जागतिक पर्यटन दिना’शी सुसंगत आहे.

चार दिवस चालणार्‍या या कार्यक्रमात राज्ये व प्रांतातील पर्यटन स्थळांचे दृकश्राव्य सादरीकरण, राज्य आयकॉन आणि यशस्वीतांकडून संदेश, प्रसिद्ध स्थानिक उद्योजकांची ओळख व हस्तकला / पारंपरिक फॅशन / व स्थानिक उत्पादनांचे आभासी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांचे तसेच सर्व राज्यांच्या सांस्कृतिक वस्तू आणि आठही राज्यांच्या एकत्रित सादरीकरणाचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, कोविड-19 नंतर ईशान्य प्रदेश हा भारतातील एक महत्त्वाच्या पर्यटन आणि व्यवसायिक स्थळांपैकी एक असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या ‘व्होकल फॉर लोकल’ वर लक्ष केंद्रीत असेल.

30.09.2020 रोजी समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू आणि सन्माननीय अतिथी म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रामेश्वर तेली यांची उपस्थिती असणार आहे.

Exit mobile version