घटस्फ़ोटित मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळावे यासाठी नियम शिथिल: डॉ. जितेंद्र सिंह
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घटस्फोटित मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळावे यासाठी नियम शिथिल केले गेले आहेत आणि आता तिच्या मृत पालक कर्मचारी. निवृत्तिवेतनधारक यांच्या हयातीत घटस्फोट याचिका मुलीकडून दाखल करण्यात आली असेल मात्र घटस्फोट झालेला नसला तरी कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळण्यास ती पात्र असेल .
निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाने केलेल्या काही महत्त्वपूर्ण सुधारणांविषयी माध्यमांना माहिती देताना केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) , पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन अणू उर्जा आणि अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पूर्वीच्या नियमात मृत पिता निवृत्तिवेतनधारक पिता किंवा त्यांच्या जोडीदाराच्या हयातीत घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली असेल तरच .घटस्फोटित मुलीला कौटुंबिक पेन्शन देण्याची तरतूद होती. नवीन परिपत्रकामुळे निवृत्तीवेतनधारकांचे जीवन सुलभ तर होईलच मात्र समाजातील घटस्फोटीत मुलींना सन्माननीय आणि न्याय्य हक्क देखील मिळतील.
दिव्यांग मुलाला किंवा त्याच्या भावंडाला निवृत्तिवेतनधारक माता- पित्याच्या मृत्यूपूर्वी अपंगत्व आले असेल मात्र त्यांच्या मृत्यूनंतर अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केले असले तरीही दिव्यांग मुलाला कौटुंबिक निवृत्तीवेतन देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दिव्यांग निवृत्तीवेतनाधारकांचे जीवनमान सुलभ होण्यासाठी मदतनीस भत्ता 4,500 रुपये दरमहा वरून 6,700 रुपये दरमहा.पर्यंत वाढवण्यात आल्याचे डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले,
डॉ जितेंद्र सिंग म्हणाले,डिजिटल लाइफ सर्टिफिकेट बाबत घेतलेला निर्णय निवृत्तीवेतन विभागाने घेतलेलय सर्वात उल्लेखनीय उपक्रमांपैकी एक आहे. सेवानिवृत्तीनंतर आपल्या मुलांसमवेत परदेशात स्थायिक झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणारी अडचण लक्षात घेऊन ते म्हणाले की, परदेशात राहणाऱ्यासाठी हयात प्रमाणपत्राबाबत एकत्रीकरणाच्या सूचना आणि कौटुंबिक पेन्शन सुरू करण्याबाबत परिपत्रक काढले असून परदेशातील शाखा आणि भारतीय दूतावास / वाणिज्य दूतावास/उच्चायोग यांना हयात प्रमाणपत्र पुरवण्याच्या आणि तिथेच कौटुंबिक पेन्शन सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, सर्व निवृत्तीवेतन वितरित करणाऱ्या बँकांना जे निवृत्तीवेतनधारक बँकेत येऊ शकत नाहीत त्यांना त्यांच्या घरी हयात प्रमाणपत्र देण्याची सूचना करण्यात आली आहे.