अंगणवाडी परिसरात कुपोषणावर मात करण्यासाठी बाग निर्मिती
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी अंगणवाड्यांमध्ये पोषणमुल्य असणा-या स्थानिक झाडांच्या बाग निर्मितीला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं केलं आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी अशी बाग फायद्याची ठरणार असून त्यासाठी केंद्रसरकारनं स्थानिक झाडांची निवड केली आहे.
अशा बागांमुळे केवळ कुपोषणावरच नाही, तर आपण कोरोना विषाणूपासून बालकं आणि गरोदर महिला यांचं संरक्षण करता येणार आहे, असं जाणकारांचं मत आहे.