Site icon साप्ताहिक एकच ध्येय

क्रीडा उपक्रम टप्प्याटप्प्यानं पुन्हा सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया फिर से’ अभियानाच्या पुढच्या टप्प्यात, साई अर्थात, भारतीय क्रीडा प्राधिकरणानं टोकियो ऑलिम्पिकमधल्या पॅराऍथलिट आणि एसएआयच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स मधील क्रीडा उपक्रम टप्प्याटप्प्यानं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

जूनमध्ये साई नं आपल्या विविध केंद्रांवर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंसाठी प्रशिक्षणाला मान्यता दिली होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन उपाययोजना घेण्याचे आदेश देखील प्राधिकरणानं दिले आहेत.

आगामी ऑलिम्पिक्स आणि आशियाई तसंच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा लक्षात घेता क्रीडा उपक्रम पुन्हा सुरु करण्यासाठी युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडून नियोजन करण्यात येत आहे.

Exit mobile version