कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं – जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी यांची मागणी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं, अशी मागणी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी यांनी केली आहे.
केंद्र शासनानं नुकत्याच मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात डॉ. गणेश देवी यांनी २४ सप्टेंबर पासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलपासून संवाद यात्रा सुरू केली आहे. आज या संवाद यात्रेचं नाशिकमध्ये आगमन झाल्यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली.
करार पध्दतीनं शेती करताना ग्रामसभेची मान्यता अनिवार्य करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यानंतर त्यांनी बाजार समितीतल्या शेतकरी आणि कामगारांशी संवाद साधला.