Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्वदेशी बूस्टर अंतर्भूत असलेल्या सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची आज सकाळी साडे दहा वाजता ओडिशाच्या आयटीआर, बालासोर येथून यशस्वी चाचणी करण्यात आली. स्वदेशी क्षमता वाढवण्यासाठीचे हे आणखी एक मोठे पाऊल आहे. स्वदेशी बूस्टर आणि एअरफ्रेम सेक्शन असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र इतर अनेक ‘मेड इन इंडिया’ उप-यंत्रणांनी युक्त आहे.

ब्रह्मोस लँड-अटॅक क्रूझ क्षेपणास्त्राचा (एलएसीएम) कमाल वेग मॅक 2.8 होता.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या अभियानासाठी डीआरडीओ कर्मचाऱ्यांचे आणि टीम ब्रह्मोसचे अभिनंदन केले. डॉ. जी. सतीश रेड्डी, सचिव डीडी आर अँड डी आणि चेअरमन डीआरडीओ यांनी या कामगिरीबद्दल वैज्ञानिक समुदायाचे अभिनंदन केले.

आजच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आत्मनिर्भर भारताचा संकल्प साकार करत शक्तिशाली ब्रह्मोस शस्त्रास्त्र प्रणालीसाठी स्वदेशी बूस्टर आणि इतर स्वदेशी घटकांच्या उत्पादन मालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Exit mobile version