Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जलशक्ती अभियान एक चळवळ व्हावी – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

????????????????????????????????????

पुणे : नेहरू युवा केंद्र व शाळा, कॉलेजातील एन.सी.सी, एन. एस. एस च्या विद्यार्थ्यांना जलशक्ती अभियानात सहभागी घेऊन हे अभियान एक चळवळ होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीकेले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जलशक्ती अभियाना अंतर्गत जिल्हास्तरीय अधिकारी यांची कामकाज आढावा बैठक जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी उदय जाधव, उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, महसूल, वन, कृषि,पाटबंधारे व अन्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी  शिरूर व पुरंदर या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जलशक्ती अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे काम करावे. तसेच आतापर्यंत झालेल्या कामकाजात देश पातळीवर पुणे जिल्हा 5 व्या क्रमांकावर असल्याबाबत जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version