Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सक्रीय रुग्णसंख्येच्या टक्केवारीचा भारतातला उतरता आलेख जारी. एकूण सक्रीय रुग्णांपैकी 76% रुग्ण 10 सर्वाधिक बाधित राज्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्रीय रुग्णसंख्येच्या  टक्केवारीचा भारतातला  उतरता आलेख जारी आहे. सध्या देशात एकूण पॉझीटीव्ह संख्येच्या केवळ  15.11% सक्रीय रुग्ण असून ही संख्या 9,40,441 आहे.

1 ऑगस्ट च्या 33.32 % वरून 30 सप्टेंबरच्या 15.11% खाली आलेली सक्रीय रुग्ण  आकडेवारीची टक्केवारी,  दोन महिन्यात निम्याहून कमी झाल्याचे दिसून येत आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून आज हा दर 83.33% झाला आहे. गेल्या 24 तासात 86,428 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आहे.

एकूण 51,87,825 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यांच्यातले अंतर 42 लाखाहून अधिक(42,47,384)  झाले आहे. बऱ्या  झालेल्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने हे अंतरही सातत्याने वाढत आहे.

देशात सक्रीय रुग्णसंख्या घटत असल्याने 22 सप्टेंबरपासून सक्रीय रुग्ण 10 लाखाच्या खाली आहेत.

सक्रीय रुग्णांपैकी 76 % पेक्षा जास्त रुग्ण 10 राज्यात, प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, छत्तीसगड आणि तेलंगण या राज्यात आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 2,60,000 पेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आहेत.

चाचण्या,शोध,उपचार, तंत्रज्ञान या धोरणाचा अवलंब करत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश,  रुग्ण वेगाने बरे होत असल्याचे नोंदवत आहेत.

14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 5000 पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत.

बरे झालेल्याच्या एकूण संख्येपैकी 78%  रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आहेत. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून 10,00,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत, त्यापाठोपाठ आंध्रप्रदेशात  6,00,000 जास्त रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात 80,472 नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 76% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे सुमारे 15,000  नवे रुग्ण असून त्यानंतर कर्नाटकमध्ये 10,000  पेक्षा जास्त रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासात 1,179 मृत्यूची नोंद झाली.

यापैकी सुमारे 85 % महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल,दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश   आणि आंध्रप्रदेशात आहेत.

नुकत्याच झालेल्या मृत्यूपैकी 36 % पेक्षा जास्त मृत्यू महाराष्ट्रात आहेत.( 430 मृत्यू )

Exit mobile version