ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज ठाण्यात रहात्या घरी, ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. गेले काही दिवस ते आजारी असल्यानं त्यांना रूग्णालयातही दाखल केलं होतं. चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
१९७८ मध्ये बंदिवान मी या संसारी चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात झाली. जसा बाप तशी पोरं, आधार, माझा नवरा तुझी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, माफीचा साक्षीदार, लपवाछपवी अशा तब्बल ८० चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.
तर त्यांची वासूची सासू, सौजन्याची ऐशी तैशी, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडासदन ही नाटकं प्रचंड गाजली होती. दामिनी या मालिकेतही त्यांनी भूमिका केली होती. त्यांनी अनेक स्टँड अप कार्यक्रमांची निर्मितीही केली होती.