Site icon साप्ताहिक एकच ध्येय

तणावग्रस्त जीवन जगणाऱ्यांसाठी लघुपटाच्या माध्यमातून जनजागृती

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सीए अरविंद भोसले यांनी रेडबड मोशन पिक्चरच्या माध्यमातून नुकताच “बॉयकॉट स्ट्रेस” इन माय स्टाईल’ नावाचा लघुपट युट्यूबवर प्रदर्शित केला आहे. कोरोना काळात उद्भवलेले नैराश्य, तणाव, त्यावरील उपाययोजना यावर प्रकाश टाकणारा हा लघुपट आहे. या लघुपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे अनेक क्षेत्रातील घटकांना मोठा फटका बसला आहे. आर्थिक घडी विस्कळीत झाल्यामुळे अनेक व्यापारी व व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात होणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातून उद्भवणारे नैराश्य, तणावामुळे अनेक जण चिंताग्रस्त आहेत. यावर सकारात्मक दृष्टिकोनातून आपण कशा पध्दतीने मात करून जीवन जगू शकतो. या सर्व घडामोडींचा विचार करीत सीए अरविंद भोसले व त्यांच्या टिमने जनजागृती व्हावी या उद्देशाने लघुपटाची निर्मीती केली आहे.

या लघुपटात अभिनेता प्रसाद खैरे, सहकलाकार सागर कटके, चिराग चौधरी, सेजल गायकवाड, नेहा धावसे , अक्षय थापा, तेजस जगदाळे, अनुराग बंडगर व संगीत दिग्दर्शन ए. के. अजय व शौनक कुलकर्णी यांनी दिले आहे. याचे प्रोड्युसर प्रमोद आरबुज आहेत, छायाचित्रण व एडिटिंग आकाश खाटीकमारे यांनी केले आहे. या संपूर्ण टीमने “बॉयकॉट स्ट्रेस” हा लघुपट प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे.

Exit mobile version