Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा मंत्री छगन भुजबळ यांचा निर्णय

कार्यकर्त्यांनी गर्दी न करता आपापल्या विभागात कोरोनाबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे आवाहन

मुंबई  : देशात आणि राज्यात कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे दि.१५ ऑक्टोबर रोजी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरला कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गर्दी न करता आपापल्या विभागात कोरोनाबाबत आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम तसेच जनजागृतीपर उपक्रम राबवावे असे आवाहन मंत्री श्री. भुजबळ यांनी केले आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून राज्यात आणि जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक नागरिक या आजाराचा सामना करत आहेत. कार्यकर्ते तसेच हितचिंतकानी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास कार्यालयात गर्दी करू नये. राज्यभरातून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली सामाजिक जबाबदारी म्हणून गर्दी न करता आरोग्य विषयक जनजागृती व सामाजिक उपक्रम राबवावे असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

Exit mobile version