Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 120 दिवसांवर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातला कोरोनाचा उद्रेक कमी झालेला दिसतो. पण तो दिसतो तितका कमी झालेला नाही. दररोज आढळणार्‍या नवीन बाधितांची संख्या निम्मयावर आली असली तरी दररोज होणार्‍या चाचण्यांची संख्याही घटली आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोविड 19 चे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 120 दिवसांवर पोहोचला आहे.

गेल्या महीन्यात हा कालावधी 74 दिवसांचा होतासप्टेंबर महीन्यात शहरात कोरोनाचा मोठा उद्रेक पहायला मिऴाला. दिवसाला हजाराच्या घरात रुग्णसंख्या जात होती. आता दिवसाला सरासरी पाचशेच्या आसपास रुग्णसंख्या असुन या महीन्याच्या सुरवातीपासुनच रुग्णवाढीला आऴा बसल्याचं आकडेवारीवरुन दिसतं. 

पण हे चित्र तितकंसं खरं नाही. जेव्हा हजार रुग्ण सापडत होते तेव्हा चाचण्याही साडेचार हजार होत होत्या आता 500 सापडतात पण चाचण्यांची संख्याही 3 हजारावर खाली आली आहे. याचाच अर्थ चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाण फार खाली आलेलं नाही.

शहरातील आत्तापर्यंतच्या कोरोना बाधितांचा आकडा 83 हजाराच्या घरात असुन उपचार सुरू असलेले रुग्ण 5 हजार सहाशेच्या आसपास आहेत. आगामी नवरात्र, आणि दिवाऴी या सणांच्या पार्श्वभुमीवर संसर्ग वाढण्याची शक्यता असुन नागरिकांनी दक्ष राहण्याचं आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काल केलं. 

Exit mobile version