Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनावरच्या औषधांबाबत, समन्वयानं काम करण्याची मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला सूचना

Bombay High Court at Mumbai is one of the oldest High Courts of India

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- कोरोनावरच्या उपचारांसाठी वापरली जाणारी औषधं, त्यांची उपलब्धता आणि दर याविषयी सामान्य नागरिकांनाही माहिती असायला हवी. त्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं समन्वयानं काम करावं अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे.

कोरोनावरच्या उपचारासाठी वापरी जाणारी औषधं आणि इंजक्शनं थेट रुग्णालयांमधेच उपलब्ध करून द्यावीत यासाठी दाखल झालेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मुख्य न्यायाधिश न्यायमुर्ती दीपांकर दत्त आणि न्यायमुर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या पीठानं ही सूचना केली.

कोरोनावरच्या उपचारासाठी महत्वाचं मानलं जात असलेलं रेमडेसीव्हीर हे इंजक्शन काही मोजक्याच औषधांच्या दुकानात मिळतं. त्यामुळे उपचारांनाही उशीर होतो तसंच बहुसंख्य लोकांना ते निर्धारित किमतीपेक्षा अधिक पैसे देऊनच घ्यावं लागत असल्याचा दावा या याचिकेत केला आहे

Exit mobile version