राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थात, नीटची आज पुनर्परीक्षा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थात, नीटची पुनर्परीक्षा आज होत आहे. गेल्या महिन्यात ज्यांना ही परीक्षा देता आली नाही, त्यांना आज संधी दिली जात आहे. आज सांयकाळी ५ वाजेपर्यंत ही परीक्षा चालेल. कोविड महामारीमुळे काही उमेदवारांना परीक्षेला बसता आलं नव्हतं, त्यावर सर्वोच्च न्यायालयानं पुनर्परीक्षेचा निर्णय दिला होता. १३ सप्टेंबरला झालेल्या आणि आज होणाऱ्या परीक्षेचा निकाल एकत्रितपणे येत्या १६ तारखेला जाहीर होणार आहे. या परीक्षेसाठी तब्बल १५ लाख ९७ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातल्या १४ लाख ३७ हजार उमेदवारांनी १३ सप्टेंबरला परीक्षा दिली. देशात, वैद्यकीय किंवा त्यासंबंधित अभ्यासक्रमासाठी ही राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.