Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पंडित दिनदयाळ उपाध्याय विभागीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 28 व 29 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन

पुणे : खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठया कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय,पुणे या कार्यालयामार्फत पंडित दिनदयाळ उपाध्याय विभागीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 28 व 29 ऑक्टोबर 2020 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात उद्योजकांमार्फत अधिसूचित केलेल्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. सदर ऑनलाईन मेळाव्यात विविध उद्योजकांनी ऑनलाईन पध्दतीने त्याच्याकडील रिक्तपदे महास्वयंम वेबपोर्टलवर अधिसूचित केलेली आहेत. उद्योजकांमार्फत उमेदवारांच्या मुलाखती दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्स या माध्यमाद्वारे ऑनलाईन पध्दतीने किंवा प्रत्यक्ष घेवून विविध पदांसाठी उद्योजकांमार्फत रिक्त जागांसाठी निवड करण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअर, पदवीधर उमेदवारांकरीता नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या महास्वयम वेबपार्टलवर नोंदणी व लॉग इन करुन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या टॅबमध्ये जाऊन ONLINE DIVISIONAL JOB FAIR PUNE DIVISION सिलेक्ट करावे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी अप्लाय करावे. सदर रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त श.बा.अंगणे यांनी केले आहे.

Exit mobile version