नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना आज नवी दिल्ली येथील निवासस्थानी श्रद्धांजली वाहिली.
त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय संपुष्टात आला. गोरगरीब,जनतेच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या स्वराज या उल्लेखनीय नेत्या होत्या, त्यांच्या निधनामुळे संपूर्ण भारत दु: खी आहे. सुषमा स्वराज यांचे व्यक्तिमत्व कोट्यावधी लोकांना प्रेरणा देणारे होते.
सुषमाजी एक उत्कृष्ट वक्त्या आणि उत्तम संसद सदस्य होत्या. त्यांचा पक्षपातळीवर कौतुक व आदर होत असे. भाजपाच्या विचारसरणीच्या आणि हितसंबंधांच्या बाबतीत त्यांचे मोठे योगदान होते, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
सुषमाजी एक उत्कृष्ट प्रशासक होत्या, त्यांनी अनेक मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला असून प्रत्येक मंत्रालयात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. विविध देशांशी भारताचे संबंध सुधारण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मंत्री असूनही त्यांचा काळजीवाहू स्वभाव आम्ही पहिला आहे. जगाच्या कोणत्याही भागात संकटात सापडलेल्या सहकारी भारतीयांना त्यांनी मदत केली आहे.
गेल्या पाच वर्षात सुषमाजींनी किती अथक परिश्रम घेतले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही. त्यांची तब्येत ठीक नसतानाही त्यांनी सदैव कामाला न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला असून, त्यामुळेच मंत्रालयाच्या कामात त्या टिकून राहिल्यात.त्यांची आत्मिक शक्ती आणि वचनबद्धता अतुलनीय होती.
सुषमाजी यांचे निधन हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. त्यांनी भारतासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्या स्मरणात राहतील. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, आणि प्रशंसकांच्या दुःखात सदैव त्यांच्या बरोबर आहे. ओम शांती.”