Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीटचा निकाल काल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीटचा निकाल काल जाहीर झाला. यापरीक्षेत ओडीशातल्या शोएब आफताब यानं ७२० पैकी ७२० गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर दिल्लीच्या आकांक्षा सिंग हिनं द्वितीय स्थान मिळवलं आहे.

आशिष झांट्ये हा राज्यात पहिला तर देशात १९ व्या स्थानावर आला आहे. तेजोमेय वैद्य, पार्थ कदम आणि अशोक चिल्लरगे यांनी पहिल्या ५० उमेदवारांमध्ये स्थान मिळवलं आहे. या परीक्षेत देशभरातून सर्वाधिक त्रिपुरा इथले ८८ हजार ८८९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर महाराष्ट्रातील ७९ हजार ९७४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

विद्यार्थ्यांना आपला निकाल संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल, तसंच download करता येईल.

Exit mobile version