खरीप वितरण हंगाम साठी राज्यांकडून केंद्रानं सुरू केली धान्याची खरेदी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खरीप वितरण हंगाम २०२०-२१ साठी राज्यांकडून केंद्रानं धान्याची खरेदी वेगानं सुरू आहे. आतापर्यंत सात लाख ८२ हजार शेतकऱ्यांकडून ९० लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक धान्याची खरेदी करण्यात आली आहे.
यात महाराष्ट्र, तमिळनाडू आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांकडून पाच कोटी ४८ लाख रूपयांच्या किमान आधारभूत किंमतीत मूग आणि उडिदाची खरेदी करण्यात आल्याचं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे.