नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात, ५० हजाराहून कमी, म्हणजेच ४६ हजार ७९० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. याबरोबरच देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ७५ लाख ९७ हजार ६३ झाली आहे.
याच काळात देशभरातले ६९ हजार ७२० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आत्तापर्यंत देशभरातले एकूण ६७ लाख ३३ हजार ३२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याबरोबरच देशातला कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ८८ पूर्णांक ६३ शतांश टक्क्यावर पोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं दिली आहे.
या चोवीस तासात देशभरात ५८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. सध्या देशभरात ७ लाख ४८ हजार ५३८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान देशात आत्तापर्यंत साडेनऊ कोटीहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळण्याचं प्रमाणात सातत्यानं कमी होत असून, ते सध्या ७ पुर्णांक ९४ शतांश टक्के इतकं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
या आकडेवारीवरून देशातला कोरोना संसर्गाचा वेग नियंत्रणात आल्याचं दिसतं असंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.