भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी व्हीसाचे नियम आणखी शिथिल करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : OCI आणि PIO कार्ड धारकांना तसंच पर्यटनाव्यतिरिक्त अन्य कामासाठी येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना भारतात यायला परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
या निर्णया अंतर्गत हवाई आणि जल-मार्गानं येणाऱ्या परदेशी नागरिकांना अधिकृत विमानतळांवरच्या तसंच बंदरांमधल्या तपास चौक्यांवरून भारतात प्रवेश दिला जाईल. वंदे भारत अभियान, वायू परिवहन ‘बबल’ करार तसंच नागरी उड्डयन मंत्रालयाच्या परवानगीनं येणाऱ्या अनिर्धारित वाणिज्य उड्डाणांकरता हा निर्णय लागू राहील.
तसंच या अंतर्गत भारतात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांना कोविड-१९बाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं बंधनकारक राहील.