Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई आणि परिसरात १२ ऑक्टोबरला झालेल्या वीज पुरवठा खंडीत प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत –उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई आणि परिसरात १२ ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी तसंच याबाबतचं तांत्रिक लेखापरिक्षण करुन उपाययोजना सुचवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी याबाबत संकेत दिले होते.

मुंबई आणि परिसरात वीज पुरवठा खंडीत होण्यामागची कारणं तसंच  अशी  घटना भविष्यात होऊ नये, याकरता करायच्या उपायांबाबत अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईचे विद्यतु अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्रा. बी. जी. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. तसंच येत्या सात दिवसांमध्ये या समितीनं आपला अहवाल द्यावा, ते निर्देश देण्यात आले आहेत.

Exit mobile version